जैन आगममध्ये सम्यकत्व प्राप्तीचे पाच सोपान सांगण्यात आलेले आहेत. त्यातील कालच्या प्रवचनात ‘प्रत्याख्यान’ या बद्दल सविस्तर अभ्यासले गेले तर आजच्या प्रवचनात ‘सामायिक’ करण्याचे महत्त्व सागंण्यात आले. शुध्द भाव व एकाग्रचित्ताने सामायिक करा असे जैन शासन दीपक परमपुज्य सुमित मुनीजी महाराज साहेब यांनी सांगितले. पुनिया श्रावकाने केलेली सामायिक आजही उदाहरणादाखल सांगितली जाते, त्या श्रावकाप्रमाणे आपण देखील सामायिक करून आध्यात्माची उंची गाठावी असे मोलाचे विचार व्यक्त केले गेले.
पुनिया श्रावकाने धन दौलताने मोक्ष मिळणार नाही तर दान, तपस्या आणि गुरुंचे महत्व जाणले तर मोक्ष प्राप्त होतो. पुनिया श्रावकाची गोष्ट आजही प्रेरणा देत असते. एक सामायिक ४८ मिनिटांची असते परंतु ती करत असताना संपूर्ण चित्त त्यात ओतून घ्यावे. आजच्या व्यक्ती सामायिक कशा पद्धतीने करतात याचे मार्मिक उदाहरण ही देण्यात आले. या ठिकाणी सामायिक करणारे शेठजी व एका परिस्थितीने गांजलेल्या युवकाची गोष्ट सांगण्यात आली. शेठजींचा सामायिक करण्याचा नियम असतो. सामायिक करत असताना ते आपल्या हातातील कडे बाजुला काढून ठेवत असत व एकाग्रतेने सामायिक करीत असत. गावातील एका गरीब युवकाला त्याच्या आईच्या इलाजासाठी ते सोन्याचे कडे चोरावे लागले. तो युवक ते कडे घेऊन शेठजींकडे आला. शेठजींनी ते कडे ओळखलेले असते. त्यांनी ठरविले असते तर त्या युवकाला दंड दिला असता, त्याचे कडे हिसकावले असते परंतु शेठजींनी ते कडे गहाण ठेवले आणि त्याला पैसे दिले. सामायिक करण्याचे शुद्ध भाव असणे मोलाचे असते असे आवाहन यावेळी करण्यात आले. आगमात सांगितलेल्या गोष्टी न मानणे त्याचे होणारे दुष्परिणाम याबाबत गुरु शिष्यांची कथा परमपुज्य भूतीप्रज्ञ महाराज साहेब यांनीसांगितली.