चोपडा शहरात पोलिसांची कारवाई
चोपडा (प्रतिनिधी) : शहरातील नगरपालिकेच्या मागे असणाऱ्या झोपडपट्टी भागात दि.१४ रोजी शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयित आरोपीस अटक केली आहे.त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांनी दि. १४ रोजी दुपारी ३:४५ वाजेच्या सुमारास नगरपालिकेच्या मागील बाजूस असणाऱ्या झोपडपट्टी भागात सापळा लावला. त्यात जयेश प्रदीप सपकाळ (वय २६, रा. दोंडकेवाडा निंभोरा, ता. रावेर) याच्या ताब्यातून एक गावठी बनावटीच पिस्तूल (कट्टा), एक जिवंत काडतूस मिळून आली.
सोबत दुचाकी वाहन असा एकूण १ लाख १ हजार रुपयांच मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि एकनाथ भिसे करीत आहेत.