भुसावळ शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : वरणगाव येथील एका तरुणाला गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी शुक्रवारी दि.१४ रोजी अटक केली. यावेळी त्याच्याकडून गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले आहेत. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरीष राहुल उजलेकर (रा. वरणगांव, ता.भुसावळ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.हरीश हा गावठी पिस्तूल घेऊन भुसावळ शहरात काहीतरी गुन्हा करण्यासाठी येत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूससह अटक केली. बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त माहिती मिळाली होती. भुसावळ शहरातील वरणगांव रोडवरील एम. आय.डि.सी. परिसरातील शॉपिंग काम्पलेक्स जवळ हि कारवाई करण्यात आली.
त्यावरुन पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकून त्याला पकडले. यावेळी त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीची गावठी पिस्टल, मॅगझीनसह त्यामध्ये दोन राउंड, २ हजार रुपये किमतीचे असे १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेडी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली केली आहे.