जळगाव (प्रतिनिधी) : चंदू अण्णा नगरातील संत सावता माळी नगर, समर्थनगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी सात जणांना चावा घेऊन जखमी केल्याची घटना शनिवार दि. ७ रोजी घडली. शहरात विविध ठिकाणी मोकाट कुत्र्यांची दहशत असून, शनिवारी गणपती स्थापनेच्या दिवशी संत सावता माळी नगर, समर्थनगर येथे ही घटना घडली.

कुत्र्यांनी रस्त्यावर जो दिसेल त्याच्या हात, पायाचे लचके तोडल्याने नागरिकांसह बालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. जळगाव महापालिकेने या पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
जखमींमध्ये शिवा आव्हाणेकर, यश चौधरी, महेश सपके, प्रमोद चिंचोडे, सुरेश विश्वकर्मा, रवी साबळे, शोभा सोनवणे, शुभम ढोले, डिंगबर कोळी आदींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेतला.









