जळगाव (प्रतिनिधी ) ;- तालुक्यातील शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज माध्यमिक शिक्षण मंडळ संस्था शिरसोली व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अशोक अस्वार हे होते .प्रमुख अतिथी उपाध्यक्ष दिलीप बारी, शालेय समितीचे सदस्य निलेश खलसे ,संस्थेचे सचिव सुरेश अस्वार , संस्थेचे माजी चेअरमन प्रवीण पाटील,सदस्य रामकृष्ण धनगर ,रघुनाथ फुसे ,यादवराव बारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक प्रमोद कोल्हे यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्य तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातर्फे शालेय दप्तर वाटप करण्यात आले मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन चंद्रकांत कुमावत यांनी केले प्रसंगी विद्यालयातचे पर्यवेक्षिका सुरेखा दुबे ज्येष्ठ शिक्षक सुनील भदाणे ज्येष्ठ लिपिक संभाजी अस्वार राजेंद्र खलसे उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन मनीषा अस्वार ,रंजना बारी, आशा कोळी, देविका पाटील, आकांक्षा निकम, मनीषा पायधन यांनी केले. आभार घनश्याम काळे यांनी मानले.तर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.