• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

३० लाख रुपयांचा मामला : परिचारिकेचा कारमध्ये दाबला गळा, शिरपूर तालुक्यात तापी नदीपात्रामध्ये फेकला मृतदेह

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 3, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
३० लाख रुपयांचा मामला : परिचारिकेचा कारमध्ये दाबला गळा, शिरपूर तालुक्यात तापी नदीपात्रामध्ये फेकला मृतदेह

दोन्ही सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रताप, ८ दिवस कोठडीत रवानगी

स्नेहलता चुंबळे खून प्रकरण

जळगाव (प्रतिनिधी) : सेवानिवृत्त परिचारीकेचा ३० लाखांच्या रक्कमेसाठी जिल्हा परिषदेच्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी खून केल्याचे उघड झाले आहे. घरी सोडण्याचे सांगून महिलेला कारमध्येच गळा दाबून ठार करत शिरपूर तालुक्यातील तापी नदी पात्रात पंधरा दिवसांपूर्वी तिचा मृतदेह फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेचा मृतदेह अद्याप मिळून आला नसून पोलीस तपास करीत आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी जि.प.आरोग्य विभाग व बांधकाम विभागातील दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. खून करुन संशयितांनी फेकून दिलेल्या महिलेचा मृतदेह अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांसमोर मृतदेह शोधण्याचे आव्हान आहे. स्नेहलता अनंत चुंबळे ( वय ६०, रा.खोटेनगर, जळगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. स्नेहलता चुंबळे या धरणगाव तालुक्यातील साळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारीका होत्या. त्या एप्रिल २०२३ मध्ये सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यानंतर त्या त्यांचा मुलगा समीर संजय देशमुख यांच्याकडे नाशिकला वास्तव्यास होत्या.

मयत महिलेल्या मुलाने दिलेल्या फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे महिलेला नाशिकला फ्लॅट घ्यावयाचा होता. त्यासाठी त्यांनी ३० लाखांची रक्कम २० ऑगस्ट रोजी रिंग रोडवरील बँकेतून काढली होती. याच माहितीच्या आधारावर तालुका पोलिसांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या फुटेजमध्ये स्नेहलता यांच्यासोबत जिजाबराव पाटील हे आढळून आले. जिजाबराव पाटील हे साळवा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात लिपीकाचे काम करतात.

पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, स्नेहलता चुंबळे यांना खोटेनगर स्टॉपजवळ सोडल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांकडून त्यानंतर जिजाबराव पाटीलचे फोन कॉल डीटेल्सचे तपासले. त्यातून जिजाबरावने विजय निकम याच्याशी सर्वाधिक संपर्क केल्याचे स्पष्ट झाले. त्यातून दोघांना ताब्यात घेतल्यानंतर दोघांनीही खुनाची कबुली दिल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी महिलेसोबत रिंगरोडवरील बँकेतून ३० लाखांची रक्कम काढल्यानंतर त्यांच्या कारमध्ये बसविले. त्यानंतर महिलेला घरी सोडले नाही. तसेच वाहनातच महिलेचा गळा आवळून खून केला. त्यानंतर महिलेचा मृतदेह शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील तापी नदीच्या पुलावरुन नदीत फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार फ्लॅट घेण्यासाठी महिलेला ३० लाख रुपये काढायचे होते. हे जिजाबराव पाटील याला माहिती होते. महिलेसोबत एकाच ठिकाणी कामाला असल्याने, जिजाबराव हा महिलेसोबत पैसे काढायला गेला होता. फ्लॅट घेताना कॅश रक्कम दिली तर फ्लॅट कमीमध्ये मिळेल असे सांगत जिजाबरावने महिलेचा विश्वास जिंकला. त्यानंतर त्या पैशांसाठी महिलेचा खून केल्यानंतर महिलेचा मृतदेह तापी नदीत फेकून दिला. आता हा मृतदेह फेकून १५ दिवस उलटले आहेत. मात्र, अजूनही मृतदेह सापडलेला नाही. पोलिसांकडून मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. दरम्यान दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

महामार्गावरील अपघातप्रकरणी ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

Next Post

बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकासह वसुली अधिकाऱ्याला दीड लाख रुपयांची लाच घेताना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकासह वसुली अधिकाऱ्याला दीड लाख रुपयांची लाच घेताना अटक

बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकासह वसुली अधिकाऱ्याला दीड लाख रुपयांची लाच घेताना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon