• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शाळेतून मुलाच्या अपहरणाचा डाव फसला, मुलगा घरीच असल्याने बचावला !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 1, 2024
in खान्देश, जळगाव
0
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

भडगाव शहरातील घटना, दोघांना अटक

भडगाव (प्रतिनिधी) : येथील बाळद रोड लगत उच्चभ्रू वस्ती असलेल्या साईनगरातील अल्पवयीन मुलाचा अपहरणाचा प्रयत्न सतर्कतेमुळे फसला. तर अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात देत त्याविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २९ रोजी घडली आहे.

शहरातील साईनगर येथील रहिवासी व पाचोरा तालुक्यातील पिंप्री येथील टेक्निकल माध्यमिक विद्यालयातील शिक्षक जितेंद्र रायचंद परदेशी यांचा मुलगा पार्थ परदेशी हा शहरातील न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत ज्युनियर केजीत शिक्षण घेतो. संशयित आरोपी पार्थच्या अपहरणासाठी शाळा परिसरात पाळत ठेवून होते. दरम्यान, भडगाव पेठमधील अविनाश गुलाब पाटील व गोकुळ देविदास पाटील या दोन्ही संशयित आरोपींनी शाळेत जाऊन पार्थला घेण्यासाठी आलो आहोत, असे संबंधित शिक्षकांना सांगितले.

परंतु, २९ रोजी पार्थ आजारी असल्याने तो घरीच होता. दरम्यान, मुलाला घेण्यासाठी आलो आहोत असे सांगण्याऱ्यांचा हा मुलगा शाळेत आला नसल्याने शिक्षकांना संशय आला. त्यामुळे त्यांनी या दोघांना तेथेच थांबवून ठेवले. दरम्यान, तत्पूर्वी संशयित आरोपींनी पार्थचे वडील जितेंद्र परदेशी यांना मुलाच्या अपहरणाचा फोन केला. परंतु, पार्थ हा घरीच असल्याने पार्थचा अपहरणाचा डाव फसला. तर शिक्षक व इतर पालकांनी संशयित आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी पार्थचे अपहरण करण्याचा आमचा डाव होता, अशी कबुली दिली.

संशयित आरोपींचा फोन आला तेव्हा शिक्षक जितेंद्र परदेशी शाळेत होते. धमकीचा फोन येताच ते तत्काळ भडगावला घरी पोहोचले व त्यांनी पोलीस ठाणे गाठले. दरम्यान, जितेंद्र परदेशी हे घुसर्डी खुर्द येथील मूळ रहिवासी असून पार्थ हा शेतकरी सहकारी संघाचे संचालक रायचंद परदेशी यांचा नातू आहे. या घटनेचा तपास पो.नि. पांडुरंग पवार यांच्या आदेशान्वये हेडकॉन्सटेबल प्रदिप चौधरी करत आहेत.


 

 

Tags: #crimebhadgaon
Previous Post

रेल्वेच्या धडकेत ५१ वर्षीय इसमाचा मृत्यू

Next Post

धरणगावात विद्यार्थी सेना शाखेच्या फलकाचे प्रतापराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धरणगावात विद्यार्थी सेना शाखेच्या फलकाचे प्रतापराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन !

धरणगावात विद्यार्थी सेना शाखेच्या फलकाचे प्रतापराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon