• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

केवळ पुरस्कार मिळवणाराच नव्हे तर प्रत्येक शिक्षक हा आदर्श

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 31, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0


पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

गुलाबरावजी पाटील फाउंडेशनतर्फे शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) : आज गुरुजनांच्या आशीर्वादाने समाजाची सेवा करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे हे माझे कर्तव्य आहे. आयुष्यात अनेक वळणे येत असतात. मी आयुष्यात गुलाब गुरुजी सुद्धा झालो असतो. परंतु समाजकारणातून राजकारण करत आज राज्याची सेवा करत असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी शिक्षकांचे मला सातत्याने मार्गदर्शन लाभत आले आहे. फक्त पुरस्कार मिळवणारा हा शिक्षक आदर्श नसतो तर प्रत्येक शिक्षक हा आदर्श असतो, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

पाळधी ता. धरणगाव येथील गुलाबरावजी पाटील फाउंडेशनतर्फे आयोजित शिक्षक सन्मान सोहळ्यात प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, गट शिक्षणाधिकारी भावना भोसले, सरला पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी शेख खलील, विविध शिक्षक संघटनेचे राधेश्याम पाटील, ग स चे ज्ञानेश्वर सोनवणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आयोजक तथा जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी शिक्षक सन्मान सोहळा’ बाबतचे महत्त्व विशद करून गुरुजनाविषयी आदर व्यक्त केला.

शिक्षक होणे हा व्यवसाय नसून तो एक प्रामाणिक पेशा आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतानाच त्यांच्यातील समाजभान जागृत करण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करायला हवे. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण होईल. हे करत असताना शिक्षकांनी स्वाभिमानी पिढी निर्माण होण्यासाठी संस्कारांचे बिजारोपणही करायला हव, असे आवाहन व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी केले. आपल्या व्याख्यानात शिक्षकांशी संवाद साधताना प्रा. गणेश शिंदे म्हणाले की, आपण नोकरी करत असताना पैसा तर कमवतोच. परंतु आपले जगणे सुंदर करण्यासाठी आपण काही गोष्टी केल्या पाहिजे. निसर्गाशी जुळवून घेता आला पाहिजे. त्यासाठी झाडे लावण्यासह ते जगवण्याची जबाबदारी सुद्धा आपण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली पाहिजे. शिक्षकाचा सर्वात मोठा दागिना म्हणजे ज्ञान आणि सोबतच नम्रपणा होय. यासोबतच आपल्याला काळासोबत टिकून राहायचे असेल तर बदल स्वीकारावा लागेल.

सूत्रसंचालन प्राध्यापक भूषण पाटील यांनी केले तर नाना पाटील यांनी आभार मानले. नरेंद्र सपकाळे, मनोज माळी, जे के पाटील, धनराज मनोरे, नाना पाटील, शरद पाटील, श्रीपाद पाटील, शितल सोनार, राजेंद्र डॉ. मिलिंद बागुल, डॉ. विजय बागुल, नरेंद्र सपकाळे, कैलास वाघ, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, डी. ओ. पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती प्रेमराज पाटील, जनाआप्पा कोळी, सचिन पवार, मुकुंदराव नन्नवरे, रवींद्र चव्हाण, राजेंद्र चव्हाण, अरविंद मानकरी, कैलास पाटील यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, शिक्षिका व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Tags: #gulabrav patil #shivsena #jalgaon #mharashtra #bharat
Previous Post

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार : संशयितांना पोलीस कोठडी

Next Post

रेल्वेच्या धडकेत ५१ वर्षीय इसमाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेल्वेच्या धडकेत ५१ वर्षीय इसमाचा मृत्यू

रेल्वेच्या धडकेत ५१ वर्षीय इसमाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर
जैन कंपनी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर

June 7, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

गावठी कट्ट्यासह जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणारा जेरबंद

June 7, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

पीडितेच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी नाशिकला पाठविणार

June 7, 2026
महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
1xbet russia

महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

June 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर

June 7, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

गावठी कट्ट्यासह जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणारा जेरबंद

June 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon