सावदा — डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सी बी एस इ सावदा शाळेतील विद्यार्थी जिल्हास्तरावर धनुर्विद्या स्पर्धेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे.
१४ वर्षाखालील मुले यामध्ये वेदांत सचिन पाटील आणि मुलींमध्ये सतरा वर्षाखाली जिज्ञासा भारंबे हे दोघे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध जिल्ह्याचे खेळाडू सहभागी झाले होते . यात वेदांत सचिन पाटील हा ३१० पॉईंट मिळवून त्यानंतर जिज्ञासा भारंबे हिने ३३४ पॉईंट मिळवले. यामूळे त्यांची विभागीय स्तरावर निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक असलम अली,प्रशांत सोनवणे, वशिम शहा आणि तुषार यांचे मार्गदर्शन लाभले.े प्राचार्या भारती महाजन यांनी दोघा विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शाळेत सर्वत्र या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.