सोलापुर ;- आज(शनिवार) सकाळी आठ वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार सोलापुरात ३२ नवे करोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण रूग्णसंख्या ५४८ वर पोहोचली आहे. यात आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या ४० जणांचा समावेश आहे. दुसरीकडे करोनावर यशस्वीपणे मात करून घरी परतलेल्या रूग्णांचीही २२४ झाली आहे.