नवी दिल्ली( वृत्तसंस्था) ;– देशभरात मागील चोवीस तासांत 6 हजार 654 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असुन, 137 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 25 हजार 101 वर पोहचली आहे.
देशभरातील तब्बल 1 लाख 25 हजार 101 करोनाबाधितांमध्ये सध्या उपचार सुरू असलेल्या 69 हजार 597 जणांचा व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या 3 हजार 720 जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यता आलेली आहे. तर, टाळेबंदीमुळे करोनाच्या महासाथीचा प्रादुर्भावाचा वेग कमी करण्यात मोठे यश आल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे.