औरंगाबाद:(वृत्तसंस्था ) ;- औरंगाबाद आणि धुळ्यात आज ४४ नवे करोनाबाधित सापडले आहेत. औरंगाबादमध्ये २३ करोनाबाधित सापडल्याने येथील रुग्णांची संख्या १२४१वर पोहोचली आहे. तर धुळ्यात २१ नवे रुग्ण सापडल्याने धुळ्यातील करोनाबाधितांची संख्या १०२ झाली आहे. धुळ्यातील करोना रुग्णांनी शंभरचा आकडा गाठल्याने जिल्हा आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
औरंगाबादमध्ये आज सापडलेल्या नव्या करोनाबाधितांमध्ये सादाफ नगर येथील (१), रेहमानिया कॉलनी (१), महेमूदपुरा (१), औरंगपुरा (१), एन-८ (१), एन-४, गणेश नगर (१), ठाकरे नगर, एन-२ (२), न्याय नगर (३), बायजीपुरा (१), पुंडलिक नगर (२), बजरंग चौक, एन-७ (३), एमजीएम परिसर (१), एन-५ सिडको (१), एन १२, हडको (१) पहाडसिंगपुरा (१), भवानी नगर (१) आणि गंगापूर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी (१) या भागातील रहिवाशांचा समावेश आहे. या २३ रुग्णांमध्ये ६ महिला आणि १७ पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान, आज नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १२४१ झाली आहे. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत ४६ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ५८१ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
१,६६६ पोलिस करोनाग्रस्त; दोन दिवसांत तब्बल २८८ पोलिसांना लागण
तर धुळ्यात शुक्रवारी उशिरा आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील तब्बल २१ रूग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यात जिल्हा रूग्णालय धुळे येथील ४ व हिरे रुग्णालयातील १७ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १०२ वर पोहोचली आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांमध्ये पोष्ट ऑफिसमधील ३ कर्मचारी व शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील ४८ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.