एलसीबीची भुसावळ तालुक्यात कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे एका व्यक्तीकडे गावठी कट्टा व आठ जिवंत काडतूस असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे संशयित आरोपीला गावठी कट्टा व आठ काडतूससह अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख हे वरणगाव शहरात पेट्रोलींग करीत असताना गोपनिय माहीतीच्या आधारे वरणगाव शहरातील राज उर्फ मनोज याच्या जवळ गावठी कट्टा बाळगत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना सांगितली. त्याआधारे पोलीस हवालदार प्रितम पाटील, पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख यांच्या पथकाने राज उर्फ मनोज यास वरणगांव शहरातील तिरंगा चौकातील श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स येथील राज मोबाईल रिपेअरिंग या दुकानाजवळ मिळून आला.
संशयित राज उर्फ मनोज सुरेश शिंदे (वय ३९, रा. रामपेठ, वरणगांव ह.मु. शिवराय चौक, फुलगांव ता. भुसावळ) याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात २५ हजार रुपयाची किमतीची एक गावठी बनावठीची पिस्टल व ८ हजार रुपये किमतीचे ८ जिवंत काडतुस मिळुन आले. त्याच्या विरुध्द वरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, जळगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगरचे राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याची कारवाई करण्यात आली.