चाळीसगाव तालुक्यातील पिंप्रि येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी ) ;- चारित्र्याच्या संशयावरून पत्न्नीच्या तोंडात बोळा कोंबून तिचा दोरीने गळा आवळून खून करीत स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील पिंप्री बु प्र दे येथे २६ रोजी ५ वाजेपूर्वी उघडकीस आली असून याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, पिंप्री बु प्र दे येथील शेतकरी शिवाजी शामराव पाटील यांचे तळोदा ता. चाळीसगाव येथे शेतातील खोलीत आठ दिवसांपूर्वीच शेती कामासाठी गोपाल सत्तरसिंग पावरा उर्फ बारेला वय ३० रा. तारापूर जिल्हा गुना मध्यप्रदेश व त्याची पत्नी लक्ष्मीबाई गोपाल पावरा (बारेला ) राहायला आले होते. . ते गोविंदराव महादू पाटील यांच्या शेतात कामाला होते. गोपाल पावरा हा पत्नी लक्ष्मीबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांचे रोज भांडणे व्हायची .
त्यावरूनच गोपाल याने २६ रोजी सायंकाळी पाच वाजेपूर्वी लक्षमीबाई हिच्या चारीत्यवर संशय घेऊन भांडायला सुरुवात केली. यानंतर पत्नीच्या तोंडात बोळा कोंबून तिचा दोरीने गळा आवळून खून केला . तसेच स्वता पत्र्याच्या खोलीला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार मयत लक्ष्मीबाई हिच्या जवळच दुसर्या शेतात राहणाऱ्या बहिणीच्या लक्षात आला. हा प्रकार शेत मालकाने पोलिसांना कळविल्यानंतर घटनास्थळचा पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक विकास दादाजी शिरोळे यांच्या फिर्यादीवरून मयत गोपाल पावरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्य्क पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे करीत आहे.