नांदेड (वृत्तसेवा) : येथील नवनिर्वाचित खासदार वसंत चव्हाण गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
मध्यरात्री त्यांची तब्येत अचनाक बिघडली. त्यावेळी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अखेर पहाटे ४ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे नांदेडकरांवर शोककळा पसरली आहे.
वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच, त्यांना लो बीपीचाही त्रास होत होता. मध्येच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना सुरुवातीला नांदेड येथील रुग्णालयात दाखल केलं. काही काळ तिथे उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने वसंच चव्हाण यांना हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं.
त्यानंतर वसंत चव्हाण यांना उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सनं हैद्राबाद येथील रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे आज पार्टी त्यांची प्राणज्योत मालवली आहे यामुळे नांदेडकरांवर शोककळा पसरली आहे.
वसंत चव्हाण खासदार होण्याआधी महाराष्ट्र विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते. त्यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी २०१४ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याशिवाय मे २०१४ मध्ये त्यांची विधानसभेच्या लोकलेखा समितीवर नियुक्ती करण्यात आली होती. ते जनता हायस्कूल आणि ॲग्रीचे अध्यक्षही होते.