मासू संघटनेची मागणी
जळगाव,(प्रतिनिधी)- येथील विभागीय सहसंचालक पद तात्काळ नियमित नियुक्त करण्याची मागणी मासू संघटनेचे ॲड. दिपक सपकाळे यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सचिव, मंत्रालय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र स्टुडंट युनियनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जळगांव, धुळे, नंदुरबार खान्देश विभाग या विभागात एकुण १०० च्या वर महाविद्यालय आहेत, तरी देखील सद्यस्थितीत हे पद अतिरिक्त कारभारावर सुरु आहे.यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना या महाविद्यालयांना व विद्यार्थ्यांना करावा लागत आहेत, कोणतेच काम वेळेवर होत नाही. याला कारणीभूत उच्च व तंत्र शिक्षण विभाग आहे.
खान्देश विभाग हा भौगोलिकदृष्टय़ा मोठा आहे, त्यामुळे अतिरिक्त कारभारावर कामकाज सुरू ठेवणे म्हणजे खान्देशातील महाविद्यालयांवर अन्याय केल्या सारखे आहे.त्यामुळे आपणास महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन च्या माध्यमातून विनंती करण्यात येते की तात्काळ जळगाव येथे विभागीय सहसंचालक पद नियमित नियुक्त करण्यात यावे, आपल्या विभागाकडुन पुढील ८ दिवसात योग्य कार्यवाही न केल्यास आम्हाला संघटनेच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.