यावल शहरातील घटना
यावल (प्रतिनिधी) : शहरातील स्टेट बँकेजवळ दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले ४० हजार रुपये अज्ञात चोरट्याने लांबविले. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील सातोद रस्त्यावरील स्टेट बैंक शाखेतून प्रभाकर राघो वाघुळदे (६०, रा. न्हावी, ह.मू, मुक्काम भालोद, ता. यावल) यांनी ४० हजार रुपये काढले. एका पिशवीत ठेवून दुचाकी क्रमांक (एम.एच. १९ बी.आर. २७४७) च्या डिक्कीत पैशांची पिशवी ठेवली. दरम्यान कुणी तरी अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून रोकड लांबविली. दुचाकीवरून ते घरी आले. यानंतर रोकड लांबविल्याचे त्यांच्या लक्षात आले.
यानंतर प्रभाकर वाघुळदे यांनी यावल पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली. घटनेचा यावल पोलीस पुढील तपास करीत आहेत.