जळगाव शहरातील गणेश कॉलनी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील गणेश कॉलनी परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला काठीसह कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी दिनांक १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी दिनांक १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरात शदाब हारुन शेख (वय-१७, रा. न्यू फेडरेशन हुडको, जळगाव) हा तरुण सोमवारी १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता पायी जात होता. जुन्या भांडणाच्या कारणावरून या परिसरात राहणारा राजू पाटील, रोहित सोनवणे आणि दिपू (पूर्ण नाव माहित नाही) या तिघांनी लाकडी काठी व कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता शादाब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे राजू पाटील, रोहित सोनवणे आणि दिपू (पूर्ण नाव माहित नाही) (सर्व राहणार दुध फेडरेशन, जळगाव) या तिघांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र पाटील हे करीत आहे.