महापालिकेत घेण्यात आली आढावा बैठक
जळगाव (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ समिती गठित केली आहे. या योजनेपासून कोणतीही महिला वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. जे अर्ज नाकारले असतील त्यांच्यांशी संपर्क साधून त्रुटींची पूर्तता करावी, असे निर्देश आमदार सुरेश भोळे यांनी दिले.
महापालिकेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. आयुक्त तथा प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे यांनी आमदार सुरेश भोळे यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री लडकी बहीण या योजनेंतर्गत ऑनलाईन केलेल्या रजिस्ट्रेशन व छाननी केलेले अर्ज याबाबतची संपूर्ण माहिती यावेळी देण्यात आली. आ. सुरेश भोळे यांनी तात्पुरते रिजेक्ट झालेल्या अर्जामधील त्रुटीच्या पूर्ततेसंदर्भात लाभार्थ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांच्याकडून त्रुटींमधीत पूर्तता करण्यात आली होती.
मुख्यमंत्री लाडकी बहिण या योजनेच्या अंमलबजावणीत ‘नारी शक्ती दूत’ मोबाईल अॅपद्वारे ऑनलाइन भरलेल्या अर्जाची संख्या व ऑफलाईन भरलेल्या अर्जाची संख्या अशी एकूण ३९ हजार १५५ अशी संख्या आहे. त्यापैकी ३९,९८७ अर्जाची छाननी करण्यात आली. यातून १,८५० अर्ज तात्पुरते रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. एकूण ३७ हजार ९५३ अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. तसेच या लाभापासून कोणतीही महिला लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी अशा सूचना आमदारांनी दिल्यात.
आमदार सुरेश भोळे यांनी केलेल्या सूचनांनुसार मनपा प्रशासनाकडून सदरचे तात्पुरते रद्द झालेल्या अर्जांवर महिला लाभार्थ्यांकडून त्रुटी दूर करून घेऊ. तात्पुते रद्द झालेते अर्ज लवकरात लवकर मंजूर करून घेण्याची कार्यवाही करण्यात येईत. तसेच यापुढे येणारे ऑनलाइन रजिस्ट्रेशन द्वारे प्राप्त होणारे अर्जावर त्या त्या वेळी कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात करण्यात येईल असे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी सांगितले. यावेळी शहर अभियान व्यवस्थापक शालिग्राम लहासे यांनी आभार मानले.