मुक्ती मिळवायची असेल तर इच्छा, अभिलाशा, कामना यांच्यापासून मुक्त व्हायला हवे. ज्याने मन, इच्छा जिंकून घेतले तो बंधनात असून देखील मुक्त असतो. मुक्तीची कामना केली तर सर्वात आधी कामनांपासून मुक्त व्हायला हवे असे अत्यंत मोलाचे विचार शासनदीपक परमपुज्य सुमितमुनिजी महाराज साहेब यांनी चातुर्मास प्रवचनाच्या माध्यमातून मांडले.
आपल्या मनाची तृष्णा पर्वताहून मोठी असते. मानवाची इच्छा पूर्ण कशी होत नाही यासाठी एक काल्पनीक गोष्ट सांगितली. एक फकीर राजाकडे पात्र घेऊन येतो आणि राजन हे पात्र भरून मला काही तरी दान द्यावे अशी इच्छा आहे. राजाला वाटले पात्र छोटे आहे, शे सव्वासे सुवर्ण मुद्रा दिल्या की भरेल पात्र परंतु संपूर्ण राज खजिना, हिरे माणके, जड जवाहीर सर्व त्या पात्रात टाकले तरी ते रिकामे राहिले. शेवटी राजाने आश्चर्याने विचारले की, हे याचक हे पात्र आहे तरी कशाचे जे पूर्ण भरतच नाही? त्यावर फकीर उत्तरला की, हे राजन हे पात्र मृत मानवाच्या डोक्याच्या खोपडीपासून बनले आहे. विचार करा मृत मानवाच्या कवटीचे पात्र भरत नाही तर जिवंत मानवाची कवटी असलेल्या अनंत इच्छांची पूर्ती तरी कशी करू शकेल. पण एक ध्यानात घ्या जन्माला आलो तर मृत्यू अटळ आहे. सोमवार ते रविवार अशा कोणत्या तरी एका वारी मृत्यू येईल त्या आधी इच्छा आणि आवश्यकता याच्याबाबतचा फरक समजावा. मुक्तीच्या कामानासाठी कामनांपासून मुक्ती मिळवू या अशी अपेक्षा प.पू. सुमित मुनि जी म.सा. यांनी व्यक्त केली.
जैन धर्मातील धर्मनिष्ठ १६ महांसतीया यांचा उल्लेख आहे. त्यातील ४ महासतीयां ह्या राजा चेतक यांच्या सुपुत्री होय. अभिमान रुपी बाबींमुळे कर्मबंध कसे बांधले जातात. चेतक राजाच्या दोन्ही कन्यांचा विवाह आणि त्या संदर्भाच्या महत्त्वाच्या गोष्टी प्रस्तुत केल्या जात आहेत. आजच्या प्रवचनात प.पू.श्री ऋतुप्रज्ञजी महाराज साहेब यांनी राजा चेतक यांची गोष्ट क्रमशः सांगायला सुरवात केली आहे.