जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तुम्ही बाजारात जाऊन या असे सांगण्यासह पैसे देऊन आई-वडिलांना बाहेर पाठविल्यानंतर तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि. १२ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुकेश नारायणसिंग ठाकूर (वय ३२, सुप्रिम कॉलनी, जळगाव) मुकेश याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले भाऊ असा परिवार आहे. भाजीपाला विक्री करुन तो आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. त्यांची पत्नी दोघं मुलांसह माहेरी गेलेली असताना या तरुणाने आई-वडिलांना बाजारात जाऊन या असे सांगून त्यासाठी पैसेही दिले. त्यामुळे आई-वडील सुभाष सुभाष चौकात गेले होते. त्यानंतर घरी कोणीही नसताना मुकेश यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.
दुपारी दोन वाजेच्या सुमारास आई-वडील घरी आले त्या वेळी त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने वडिलांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता मुलगा गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसला. मुलाचा मृतदेह दिसताच मुकेशच्या आई वडीलांनी एकच आक्रोश केला. यावेळी शेजारील मंडळी व भावाने तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.