पहुर;- कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी च्या उपाययोजनांचा भाग म्हणुन जामनेर तालुक्यातील गोराडखेडा येथे केंद्रिय पथकाकडून सर्वेक्षण करण्यात आले.भारतातील 21 राज्यातील 69 जिल्ह्यामध्ये हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. महाराष्ट्रात जळगांव जिल्ह्यासह इतर पाच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे सर्वेक्षण केंद्रीय पथकाकडून करण्यात आले.20 मे रोजी केंद्रीय टीम जळगांव जिल्ह्यात दाखल झाली.
देशात विषाणू तपासणी व संशोधना चे कार्य करणाऱ्या पुणे किंवा चेन्नई येथील इंडीयन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ही संस्था सदर सर्वेक्षण करणार आहे. या सर्वेक्षणात रॅपिड टेस्ट व अँटिबॉडी टेस्ट सुद्धा करण्यात येणार आहे.त्यासाठी गावातून 40 नागरिकांचे रक्त नमुने घेण्यात आले आणि येथून सदर नमुने चेन्नई किंवा पुणे येथील नॅशनल व्हायरॉलॉजी लॅब ला पाठवण्यात येणार असून नंतर त्याचा अहवाल केंद्र सरकार ला देण्यात येणार आहे. या अहवालानुसार केंद्र सरकार कोरोना आजाराबाबत व इतर उपाययोजना बाबत धोरण निश्चित करणार आहे. जिल्हास्तरावरून सदर सर्वेक्षणासाठी 20 वाहने,आवश्यक सहाय्यक अधिकारी व कर्मचारी वर्ग, पी.पी.ई. किट व आवश्यक साधन सामुग्री सदर टीमला पुरवण्यात आली. तहसीलदार यांच्याकडून पुरेसे पोलीस संरक्षण, आवश्यक सहाय्यक अधिकारी व कर्मचारी पुरवण्यात आले. गटविकास अधिकारी यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी सर्वेक्षणा च्या गावात उपस्थित होते. सदर गावासाठी रवींद्र सूर्यवंशी यांची पथक प्रमुख म्हणून तालुकास्तरावरून नेमणूक करण्यात आली होती.डब्लू .एच.ओ चे एस. ओ. डॉ.प्रकाश नांदापूरकर यांनी गोराडखेडा येथे भेट देऊन जामनेर टीमचे व ग्रामस्थांचे कौतुक केले.