पहुर. ता.जामनेर-राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आज पासून जिल्ह्याअंतर्गत सुरू झाल्या. तब्बल दोन महिन्यानंतर लालपरी रस्त्यावर धावतांना दिसली.
पाचोरा आगाराची पहुर-पाचोरा ही बस आज सकाळी १०.४५वाजता पहुर बसस्थानक येथे पोहोचतास बसचे चालक प्रविण माळी वाहक गोपाळ गौंड यांचे सत्कार करण्यात येऊन बसचे पुष्पहार ने स्वागत करण्यात आले.यावेळी पहुर पेठचे उपसरपंच शाम सावळे, शिवसेना विभाग प्रमुख तथा पत्रकार गणेश भाऊ पांढरे रवि जाधव,वाहतूक पोलीस जवानसिंग राजपूत, शांताराम लाठे, , बडगुजर सर,रतन सोनार, समा शेख,सेवानिवृत्त नायब तहसीलदार किसन कुंभार, भिका पाटील, दिलीप बावस्कर, शाकिर शेखआदी उपस्थित होते. बस मध्ये२२प्रवासी घेऊन आहे त्याच भाड्याने ही सेवा सुरू झाली आहे. तसेच कोरोना विषाणू ची पार्श्वभूमी लक्षात घेता१०वर्षे खालील व ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाला मनाई करण्यात आली आहे.प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.