जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील म्हसावद येथे दि ७ रोजी ३३/११ के व्ही सब स्टेशन येथे गजानन महाराज मंदिराचे तिसरा वर्धापन दिवस व आरोग्य तपासणी निदान शिबिर कार्यक्रम आयोजित होता. या कार्यक्रमात १०० वृक्षारोपण लागवड महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय पुरुषोत्तम चोपडे, उप कार्यकारी अभियंता विजय सुरेश कापुरे यांच्या हस्ते लागवड करण्यात आले. या वेळी म्हसावद येथील कनिष्ठ अभियंता अतुल मोरे, वावडदेचे आकाश सोनवणे, इदगावचे कल्पेश सपके उपस्थित होते. या वेळी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित होता. प्रसंगी म्हसावद वावडदे महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.