जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील परवाना ऑटोरिक्षांचे वय वर्ष १५ म्हणजे ज्या ऑटोरिक्षांना १ ऑगस्ट रोजी १५ वर्ष पूर्ण झालेले आहेत. अशा ऑटोरिक्षांचे योग्यता प्रमाणपत्र करता येणार नाही. असा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आलेला आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी (अ.का) जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण जळगाव यांची १४ ऑक्टोबर २०२० रोजी बैठक पार पडली होती. सदर बैठकीत झालेल्या ठराव अन्वये ज्या ऑटोरिक्षांना १ ऑगस्ट, २०२४ रोजी वर्ष १५ पूर्ण झालेले आहेत. अशा ऑटोरिक्षांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्यात येवू नये, या बाबत सर्व ऑटोरिक्षा परवानाधारकांनी नोंद घेण्यात यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी (अ.का) जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.









