जळगाव (प्रतिनिधी) : येथील मेहरूण परिसरातील विचार वारसा फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण व वृक्ष वाटप करण्यात आले. नागरिकांनी यावेळी वृक्ष संगोपनाचा संकल्प करून वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली.
शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या दातृत्वातून विचार वारसा फाऊंडेशनला एकूण ५७० विविध प्रजातीचे झाडे व रोप उपलब्ध झाली आहेत. रविवारी दि. ४ रोजी मेहरूण परिसरातील नागरिकांना फाउंडेशनतर्फे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांच्या संकल्पनेतून विविध वृक्ष व वाटप करण्यात आले. प्रसंगी वृक्षारोपणाचे महत्व व माहिती विशाल देशमुख यांनी सांगितली.
यावेळी विचार वारसा फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष राजपूत, मयुर डांगे,अभिजित राजपूत, अमोल ढाकणे, आकाश राजपूत, राहुल सपकाळ, मोहम्मद हनीफ, हुम्मेहानी पठाण, अश्रफ शेख आदींनी परिश्रम घेतले. प्रसंगी नागरिकांनी केवळ वृक्षरोपण न करता त्याचे संगोपनदेखील करणार असल्याचे सांगितले. तसेच मेहरूण परिसर हिरवेगार करणार असल्याची माहिती दिली.









