जळगाव शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील दाणाबाजार परिसरातील पिपल्स बँकेजवळून एका तरूणाच्या खिश्यातून २५ हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना गुरूवार दि. १ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयेश वासुदेव महाजन (वय २० रा. धरणगाव) हे परिवारासह वास्तव्याला आहे. ते दैनंदिन वाहतूक सेवेच्या वाहनावर चालक म्हणून काम पहातात. गुरूवार दि. १ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने ते जळगाव शहरात आले होते. दाणाबाजार आवारातील पिपल्स बँकेजवळ असलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पाकिटात ठेवलेले २५ हजारांची रोकड चोरून नेले.
ही घटना उघडकीला आल्यानंतर त्यांनी रात्री ८ वाजता त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किशोर निकुंभ हे करीत आहे.