• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

रेल्वेच्या तिकीट कलेक्टरने पटकावले ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक, कोल्हापूरमध्ये जल्लोष

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2024
in भारत, महाराष्ट्र, विश्व
0
रेल्वेच्या तिकीट कलेक्टरने पटकावले ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक, कोल्हापूरमध्ये जल्लोष

स्वप्नील कुसाळेने लावला अचूक ‘नेम’ ; रेल्वेकडून ‘प्रमोशन”ची घोषणा

मुंबई (प्रतिनिधी) : पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या कोल्हापूरच्या सुपुत्राने, स्वप्नील कुसळेने इतिहास रचला आहे. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत स्वप्नीलने कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमधील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत भारतीय नेमबाजाने प्रथमच पदक जिंकले आहे. सध्या सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक आहे. स्वप्नीलने एकूण ४५१. ४ गुण मिळवले.

मराठमोळ्या स्वप्नीलच्या या कामगिरीनंतर देशासह संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. स्वप्नील कुसाळे हे २०१५ पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहेत. ज्याप्रमाणे एमएस धोनी त्याच्या आयुष्यात तिकीट कलेक्टर होता, त्याचप्रमाणे स्वप्नील देखील मध्य रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो. स्वप्नीलच्या या कामगिरीनंतर रेल्वे प्रशासनाला देखील आनंद झाला आहे. ७२ वर्षानंतर एका मराठी मुलाला ऑलिंपिकमध्ये पदक मिळालेले आहे. मात्र हा स्वप्निल सध्या मध्य रेल्वेच्या पुणे डिव्हिजन मध्ये टीसी म्हणून काम करतोय. यामुळेच मध्य रेल्वेसाठी ही गर्वाची गोष्ट आहे.

ज्यावेळेस स्वप्निल हा पॅरिसहून भारतात येईल त्यावेळेस भारतीय रेल्वेकडून त्याचा यथोचित सन्मान केला जाईल आणि ताबडतोब त्याला ऑफिसर म्हणून प्रमोशन देण्यात येणार आहे, अशी घोषणा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी केली. त्याचप्रमाणे रेल्वेमंत्री स्वप्नीलसाठी रोख बक्षीस देखील जाहीर करणार आहेत, त्यामुळे आता स्वप्निल हा मध्य रेल्वेचा एक ऑफिसर म्हणून यापुढे काम करेल, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी जाहीर केले आहे. तसेच मध्य रेल्वेची अंकिता ध्यानी ही देखील ऑलम्पिकसाठी पॅरिसला गेली असल्याने तिला देखील राम करण यादव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वप्नीलमुळे कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक असे पहिले पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांचे स्मरण झाले. तब्बल ७२ वर्षांनी स्वप्नीलने महाराष्ट्रासाठी या पदकाचा वेध घेऊन, तशाच पद्धतीचा आनंद आणि उत्साह राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी निर्माण केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नेमबाजीची एक मोठी परंपरा आहे. ही परंपरा स्वप्नीलने कायम राखली आहे. कोल्हापूरमधील कांबळवाडी सारख्या ग्रामीण भागातून येऊन स्वप्नीलने आपले राज्य आणि देशाचे नाव आंतरराष्ट्रीयस्तरावर झळकवले आहे. देशासाठी वैयक्तिक पदकाची कमाई करताना, स्वप्नीलने महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील गौरव वाढवला आहे. स्वप्नीलच्या या यशात त्यांचे कुटुंबिय, प्रशिक्षक, मार्गदर्शक यांचे मोलाचे योगदान आहे, या सर्वांचे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्यावतीने अभिनंदन, असे मुख्यमंत्र्यानी यापुढेही स्वप्नीलच्या वाटचालीसाठी आवश्यक असे सर्व ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदेंनी दिली.

म्हाया नातवानं करुन दावलं : आजीचा जल्लोष
नातवानं ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर स्वप्नीलच्या आज्जीच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. आज्जीचे डोळे आंनदाश्रूंनी भरले होते. “लय चांगलं झालं… म्हाया नातवानं करुन दावलं, माझा नातू लय मोठ्ठा झाला… आमचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी हाय… लहानाचा मोठ्ठा झालाय, लहानपणापासून बाहेर गेलाय, लय चांगलं झालं..” अशी बोलकी प्रतिक्रिया आजीने दिली आहे.

स्वप्नीलची यापूर्वीची कामगिरी
स्वप्नील कुसाळे, हा महाराष्ट्रातील स्पोर्ट नेमबाज आणि मध्य रेल्वेचा कर्मचारी आहे. ५० मीटर रायफल ३ पोझिशन स्पर्धेत पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी त्याने भारतीय संघात स्थान मिळवले. यापूर्वी २०२२ मध्ये, त्याने दि. २२ ऑक्टोबर रोजी इजिप्तमधील कैरो येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चौथ्या स्थानासह पुरुषांच्या ५०-मीटर रायफल ३-पोझिशन स्पर्धेतून ऑलिम्पिक कोटा बर्थ मिळवला होता. त्याने २०२३ मध्ये चीनमधील आशियाई खेळांमध्ये नेमबाजीत सुवर्णपदके, २०२२ मध्ये बाकू येथे आणि २०२१ मध्ये नवी दिल्ली येथे विश्वचषक जिंकला आहे. याशिवाय त्याने २०१५ ते २०२३ या कालावधीत विविध नेमबाजी स्पर्धेत रौप्य आणि कांस्य पदके जिंकली आहेत. पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमधील नेमबाजी स्पर्धेत तो भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे.


 

Tags: kolhapurolympicjalgaon
Previous Post

जैन इरिगेशनचा कन्सॉलिडेटेड कर, व्याज घसारापूर्व नफा (इबीडा) १८०.८ कोटी

Next Post

शिक्षण सप्ताहात विद्यार्थ्यांचे विविध कलागुण सादरीकरण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिक्षण सप्ताहात विद्यार्थ्यांचे विविध कलागुण सादरीकरण

शिक्षण सप्ताहात विद्यार्थ्यांचे विविध कलागुण सादरीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक
1xbet russia

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

June 25, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !
1xbet russia

डॉ. स्नेहल रावते अपघात प्रकरणात चालकाला अटक, आणखी एकाचा शोध सुरु

June 25, 2025
मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी
जैन कंपनी

मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी

June 25, 2025
आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार
1xbet russia

आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार

June 25, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

June 25, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !

डॉ. स्नेहल रावते अपघात प्रकरणात चालकाला अटक, आणखी एकाचा शोध सुरु

June 25, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon