मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबईत कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. याचा सर्वात मोठा फटका हा सामान्यांना बसला आहे. वेगवेगळ्या पातळीवर नागरिकांना मदत केली जात आहे. शिवसेनेकडून केलेल्या मदतीवर मनसेच्या संदीप देशपांडेंनी टीका केली आहे.
कुलाबा विधान परिसरात शिवसेनेकडून महिलांसाठी सॅनिटरी पॅड्सचं वाटप करण्यात आलं. ५०० सॅनिटरी नॅपकिन्सची पाकिट वाटण्यात आली. या सॅनिटरी पॅड्सच्या पाकिटावर आदित्य ठाकरेंचा फोटो लावण्यात आला होता. यावरून शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अशी परिस्थितीत जाहिरातबाजी केली गेली.
मनसेचे संदीप देशपांडे यांनी ट्विट करून सवाल केला आहे की,’कशावर कोणाचा फोटो टाकायचा हे कळत नाही ?आता म्हणतील राजकारण नको. आधीच फोटो छापले होते का?’ असा देखील प्रश्न विचारला आहे.
Sandeep Deshpande
@SandeepDadarMNS
कायरे लाचारानो हे पण आधीच छापले होते का? कशावर कोणाचा फोटो टाकायचा हे कळत नाही ?आता म्हणतील राजकारण नको
View image on Twitter
948
8:22 AM – May 21, 2020
Twitter Ads info and privacy
263 people are talking about this
सॅनिटरी पॅडवरून राजकारण होताना दिसत आहे. सध्या मुंबईत कोरोनाचा कहर जास्त आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणं सील करण्यात आली आहेत. अशावेळी महिलांना कंन्टेन्मेंट झोनमधून बाहेर पडणं कठीण आहे. अशावेळी अनेक संस्था, राजकीय पक्ष पुढे येऊन मदत करत आहेत. अशावेळी त्या मदतीवर जाहिरातबाजी करणं किती योग्य? असा सवाल निर्माण केला जात आहे.
आदित्य ठाकरेंनी जाहिरातबाजी केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. आता शिवसेने राजकारण नको असं म्हणेल. पण यांनी कशावर फोटो टाकायचा याचा तरी विचार करायचा? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.







