जळगावातील घटना, चौघांविरुद्ध तक्रार
जळगाव (प्रतिनिधी) :येथील चार संशयित आरोपींवर पॉक्सोचा गुन्हा दाखल आहे. तरीही संशयित आरोपी अद्याप मोकाट असून त्यांनी पुन्हा एका महिलेला फोनवरून शिवीगाळ करून धमकी दिली आहे. यामुळे या महिलेने रामानंदनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेखा सुभाष पाटील (वय ३६, रा. आरएमएस कॉलनी, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी सुवर्णा कृष्णा पाटील, कृष्णा पाटील, अजय पाटील, वंदना अजय पाटील यांच्यावर यापूर्वी पॉक्सो अंतगत गुन्हा दाखल आहे. असे असताना संशयित आरोपींनी तक्रारदार रेखा पाटील याना फोनवर धमकी व शिवीगाळ दिली. तसेच समाजात बदनामी केली म्हणून रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.