शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घेतली भेट
जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव येथे शेतात नेतांना काही शेत मजूर महिलांचा अपघात झाला होता. घटनेची माहिती मिळताच माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत रुग्णांची विचारपूस केली. वैद्यकीय पथकाशी संवाद साधून प्रकृतीची माहिती घेतली.
धरणगावातील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ शेतमजूर महिलांना शेतात नेणाऱ्या वाहनाला अपघात झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी घडली होती. जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच जखमींची विचारपूस करत त्यांना धीर दिला. यावेळी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर हे उपस्थित होते. निनाबाई महाजन, सुमन महाजन, माधुरी महाजन, जिजाबाई महाजन, स्वाती महाजन, ढगूबाई महाजन, महेंद्र पाटील हे जखमी आहेत.