रावेर (प्रतिनिधी) : तापी आणि पुर्णा नद्यांच्या संगमावर पाऊस गेल्या काही दिवसांपासून सुरूच असल्याने आज सोमवारी दिनांक २९ जूलै रोजी हतनुर धरणाचे १२ दरवाजे पुर्ण क्षमतेने उघडलेले आहे. सोमवारी रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस संततधार पद्धतीने सुरूच आहे. त्यामुळे पिकांना दिलासा मिळत असला तरी काही ठिकाणी नुकसानीची चिन्हे आहेत.
यावर्षी हतनुर धरणात ही ४ थी वेळ दरवाजे खुले करण्याची आहे. मध्य प्रदेशातील बुरहानपुर तसेच तापी नदीच्या उगम क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरूच आहे. म्हणून सतत पाण्यात वाढ होत असून पाणीपातळी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच प्रमाणे पुर्णा नदीच्या उगम क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात काही दिवसापासून पाऊस सुरूच आहे. त्यामुळे दोन्ही नद्यांची पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे.
दरम्यान, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा तहसिलदार ए.बी.कापसे यांनी दिला आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये मात्र सावधान रहावे असेही त्यांनी सांगितले आहे.
हतनूर प्रकल्प
दिनांक – 29/07/2024
वेळ – 10.00 Hrs
पाणी पातळी – 210.910 मी.
एकुण पाणी साठा= 230.50 दलघमी.
एकुण पाणी साठा टक्केवारी = 59.41%
विसर्ग- 1822 क्युमेक्स (64344 क्युसेक्स)
दरवाज्यांची सद्य स्थिती –
12 दरवाजे पूर्ण उघडे