शिरसोली (प्रतिनिधी ) ;- बारी समाज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय शिक्षण सप्ताह अंतर्गत राष्ट्रीय सामाजिक वनीकरण विभाग जळगाव व हरित सेने द्वारे विद्यालयात वृक्षारोपण
बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज “राष्ट्रीय शिक्षण सप्ताह” अंतर्गत सामाजिक वनीकरण विभाग जळगाव व राष्ट्रीय हरित सेनेद्वारे विद्यालयात व शिरसोली गावात सुमारे 100 वृक्षांचे लागवड व वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अशोक बारी, संचालक निलेश खलसे , सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी वनरक्षक संभाजी पाटील ,डॉक्टर. सोपान पाटील ,मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर ,हरित सेना प्रमुख चंद्रकांत कुमावत ,पर्यवेक्षिका सुरेखा दुबे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .त्याचप्रमाणे विद्यालयातील जेष्ठ शिक्षक रामकृष्ण पाटील ,सुनील भदाणे ,संजय काटोले ,भरत बारी, अशोक बावस्कर यांच्या हस्ते शिरसोली गावात सुमारे 100 वृक्षांचे वाटप करण्यात आले प्रसंगी गावातील प्रतिष्ठित गावकरी उपस्थित होते.