• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने तरुणाईसाठी उघडले शासकीय नोकरीचे दार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 26, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
हातपंप वीजपंप देखभाल दुरुस्ती कर्मचाऱ्यांना ४६ वर्षांनी मिळाला न्याय

पुस्तके, सुसज्ज संगणक लॅब असलेले ५ कोटी रुपयांचे जिल्हा ग्रंथालय भवन

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा नियोजन समितीच्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून जळगाव येथे भव्य जिल्हा ग्रंथालय समिती कार्यालय उभे राहिले आहे. या ग्रंथालयातील दोन सुसज्ज अभ्यासिकांमध्ये जळगाव शहरासह ग्रामीण भागातील तरुणाई स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून या ग्रंथालयाच्या सौर उर्जा प्रणालीसाठी अतिरिक्त ३१ लाख ५२ हजार रूपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

जळगाव मधील महाबळ परिसरात तब्बल २६.५ गुंठे जागेवर १६ हजार चौरस फुटांचे बांधकाम असलेले सुसज्ज असे जिल्हा ग्रंथालय भवन उभारण्यात आले आहे. या इमारतीत एक एसी व एक नॉन एसी अभ्यासिका, अंधांसाठी, महिला व बालकांसाठी स्वतंत्र विभाग आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यासह येथे संगणक कक्ष देखील उभारण्यात आला असून त्यात १५ संगणक, प्रिंटर, झेरॉक्स मशिन आदि सुविधा इंटरनेटसह उपलब्ध आहेत. तज्ञांच्या व्याख्यानांसाठी प्रशस्त ऑडोटेरियम देखील आहे.

या ग्रंथालय भवनात २५ हजार ५०० पुस्तके व ग्रंथसंपदा आहे. यास स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संदर्भ विभाग देखील आहे. या अभ्यासिका विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करुन दिल्या जातात. येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करुन दरवर्षी ८ ते १० तरुण शासकीय सेवेत रुजू होत असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांनी दिली. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने ग्रंथांलय भवनात ३१ लक्ष ५२ हजार रुपयांची सोलर सिस्टिम उभारण्यात आली आहे. डीपीडीसी निधीतून बसविण्यात आलेल्या या सोलर सिस्टिममधून ५० केव्ही विजनिमिर्ती होते. यामुळे वर्षभरात ८ महिने येथे वीज बिल येत नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात विजेची बचत होते. आता महाबळ रस्ता ते ग्रंथालयाच्या मुख्य इमारतीपर्यंत ३५ लक्ष रुपयांचे सिमेंट रस्ता काँक्रिटीकरण नियोजित आहे.

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे ग्रंथालय भवनाकडे विशेष लक्ष असते. येथे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणाईला मोफत अभ्यासिका, मोफत पुस्तके, मोफत व्याख्यानमाला आदी सुविधा पुरविण्यात येतात. याचा लाभ जास्तीत जास्त तरुणाईला लाभ घ्यावा, यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील दक्ष असतात. तरुण-तरुणींनी या मोफत अभ्यासिकेचा लाभ घेवून स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे, असे आवाहन ना.पाटील यांनी केले आहे.


 

Tags: #jalgaongulabrao patil
Previous Post

हृदयद्रावक : १४ वर्षीय मुलीने घेतले विषारी औषध, उपचारादरम्यान मृत्यू !

Next Post

आर्थिक कारणाने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आर्थिक कारणाने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

आर्थिक कारणाने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon