जळगाव ;- रिधुर गावात इतर गावांतील जे नागरिक गावात आले आहे त्यांना ग्रामपंचायती तर्फ नोटीस देण्यात आल्या. सध्या सर्वत्र कोविड -१९ या रोगाने थैमान घातले असुन कोरोना आजाराची लक्षणे उशीराने दिसुन येत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता व गावाच्या आरोग्याच्या दुष्टीने गावात आल्या पासुन १४ दिवस घरातच राहुन किंवा गावातील शाळेत राहुन काळजी घ्यावी व कुणाच्या संपर्कात न येता राहणे व शासनाच्या आदेशाचे पालन करावे. या आदेशाच्या नोटीस देण्यात आल्या . या प्रसंगी सरपंच रंजना पाटील ग्रामसेविका स्वाती पाटील पोलीस पाटील प्रमोद पाटील व अगंणवाडी सेविका आशा वर्कर व मदत नीस यांनी गावात घरोघरी जाऊन जनजागृती केली व बाहेर गावाहुन आलेल्या लोकांना नोटीस बजावल्या . या कामी गटविकास अधिकारी शशीकांत सोनवणे ग्रामविस्तार अधिकारी निळकंढ ढाके व आरोग्य विस्तार अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.







