कोलकाता( वृत्तसंस्था ) : पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यात अम्फान या चक्रीवदाळाने हाहाकार माजला (Amfan Cyclone Kolkata) आहे. या चक्री वादळाचा वेग ताशी सुमारे 160 ते 180 इतका आहे. या वादळामुळे पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत 10 ते 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोलकत्ताच्या अनेक भागामध्ये पाणी भरलं आहे. या वादळाचा फटका कोलकाता विमातळालाही बसला आहे. विमानतळाच्या चारही बाजूने पाणी भरलं (Amfan Cyclone Kolkata) आहे.
या एका तासाच्या अम्फान वादळामुळे कोलकाता विमानतळाचे मोठे नुकसान झाले आहे. विमानतळामध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी भरलेलं आहे. विमानतळाची धावपट्टी आणि हँगर पाण्याखाली बुडाले आहेत. विमानतळाचा काही भाग तर पूर्ण पाण्याखाली गेला आहे. या वादळामुळे विमानतळारील उड्डाणे आणि इतर कामकाज आज सकाळी 5 पर्यंत बंद केले होते. ते अजूनही बंद आहेत.
अम्फान वादळामुळे दोन्ही राज्यात धुमाकूळ घातला आहे. या वादळामुळे झाडे पडली, घराचे छत उडाले, दिव्यांचे खांब तर काडीपेटीतील काड्यांसारखे उडाले आहेत.
बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर हे वादळ धडकल्यामुळे अम्फान वादळाचा वेग ताशी सुमारे 180 इतका होता. अम्फान वादळाचा सर्वात जास्त हाहाकार पश्चिम बंगालच्या उत्तर 2 रगना, दक्षिणी 24 परगना, मिदनापूर आणि कोलकातामध्ये झाला आहे.
पश्चिम बंगालमध्ये या वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘अम्फान वादळामुळे आतापर्यंत 10 ते 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू झाडे पडल्यामुळे झाला आहे. ओडिशामध्येही तीन लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही राज्यात बचाव कार्य सुरु आहे.’







