
जळगाव शहरातील पिंप्राळा भागातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील पिंप्राळा परिसरातील सोमानी मार्केट जवळ हातात कोयता घेवून दहशत माजविणाऱ्या अक्षय उर्फ गंप्या नारायण राठोड (वय २५ रा. यश नगर) या तरूणावर रामानंद नगर पोलीसांनी मंगळवार दि. २३ जुलै रोजी कारवाई केली. पोलीसांनी कोयता जप्त केला असून तरुणाविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पिंप्राळा परिसरातील सोमानी मार्केट जवळ संशयित आरोपी अक्षय उर्फ गंप्या नारायण राठोड हा हातात लोखंडी कोयता घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या.
पोलीस पथकाने मंगळवारी २३ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता संशयित आरोपी अक्षय उर्फ गंप्या राठोड याच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून लोखंडी कोयता हस्तगत केला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल उमेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय सपकाळे हे करीत आहे.









