पुणे (वृत्तसंस्था) – कापूरहोळ, संपूर्ण जगात करोनाने थैमान घातले आहे. पुणे शहरात व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हळूहळू शिरकाव झाल्यामुळे भोर, नसरापूर मुख्य बाजापेठ ओस पडल्या आहेत. शेतीचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यावर अवलंबून असलेला बारा बलुतेदार समाज आर्थिक अडचणीत आला आहे.
हाताला काम नाही त्यामुळे उदरनिर्वाह चालायचा कसा, हा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे. जवळपास 50 ते 55 दिवस करोना प्रादुर्भावामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे भोर तालुक्यातील बारा बलुतेदार समाजाचा तसेच हातावर पोट असणाऱ्या समाजाच्या रोजी रोटीबाबत उपाययोजना करावी, या मागणीसह तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालास बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकीसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.
यावेळी भाजप भोर तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, कार्याध्यक्ष राजेंद्र मोरे, विश्वास ननावरे, ऍड. कपिल दुसंगे, अमर बुदगुडे, दिपाली शेटे, शहराध्यक्षा स्वाती गांधी, संतोष लोहोकरे, प्रा. विजयकुमार वाकडे व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.







