संगमनेर तालुक्यातील घटना ; संशयिताविरुद्ध गुन्हा
अहमद नगर (वृत्तसंस्था ) १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका विवाहित तरुणाने मारून टाकण्याची धमकी दिली, त्याने तिच्यावर तीन-चार वेळा जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्याची घटना संगमनेर तालुक्यात उघडकीस आली असून यानंतर पीडित मुलीने एका मुलीला जन्म दिला आहे. याबाबत एका ३६ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , २०२३ मध्ये नोव्हेंबर महिन्यात संशयित आरोपीने मुलीला धमकी देत तिच्यावर अत्याचार केले होते. दरम्यान पीडित मुलगी गर्भवती राहिली, २१ जून २०२४ ला तिची प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिला. ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश्वर संपत उर्फ सोपान बोडखे (वय ३६, रा. तळेगाव दिघे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
अल्पवयीन मुलगी तालुक्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी आहे. ती शालेय शिक्षण घेते. २०२३ नोव्हेंबर महिन्यात ती तिच्या आई-वडिलांसमवेत लोकांच्या शेतात कुट्टी करण्यासाठी गेली होती. मका कापणे, ती जमा करणे आदी कामे ती करायची. बोडखे याची पत्नी सुद्धा कामाला यायची. त्यांचे भांडण झाले की, ती दोन-चार दिवस माहेरी निघून जायची. एकदा मुलीचे आई-वडील सोबत आले नव्हते, त्यावेळी रात्री ११ वाजता काम झाल्यानंतर बोडखे हा तिला त्याच्या घरी चल म्हणाला.
मुलगी त्याच्यावर ओरडली. घरी सोबत न आल्यास त्याने तिला मारून टाकण्याची धमकी दिली. मुलगी घाबरून त्याच्या घरी गेली. तेव्हा त्याची बायको माहेरी गेली होती. त्याने मुलीवर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केले.
कुणाला काहीं सांगितल्यास आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली. धमकी देऊन त्याने तीन-चार वेळा मुलीला त्याच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान याबाबत संगमनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.