जळगाव;- एमआयडीसी परिसरातील आर.एल. चौफुली जवळ असणार्या सागर हॉटेलच्या मागच्या बाजुला एक जण अवैधरित्या विदेशी दारूंची विक्री करतांना 20 मे रोजी आढळून आला. त्याच्याकडून 3 हजार 640 रूपयांची विदेशी मद्य हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई एमआयडीसी पोलिसांनी केली आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, एमआयडीसी पोलिसांना मिळालेली माहिती अशी की, आरोपी सागर नारायण सोनवणे (वय-22,रा.सुप्रिम कॉलनी) हा आर.एल. चौफुलीजवळील सागर हॉटेलच्या मागे विदेशी मद्य विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार अतुल वंजारी, सहा. फौजदार आनंदसिंग पाटील, पो.कॉ. निलेश पाटील, पो.कॉ. आसिम तडवी, पो.कॉ.इम्रान सैय्यद, गोविंदा पाटील आदींच्या पथकाने आर.एल. चौफुली जवळील हॉटेल सागरच्या पाठीमागे छापा मारून सागर सोनवणे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून आय.बी. कंपनीच्या 180 एम.एल.च्या 26 बाटल्या जप्त केल्या. त्याच्यावर एमआयडीसी पोलिस स्टेशनला विनापरवाना विदेशी दारू बाळगल्यानुसार दारूबंदी अधिनियम कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा.फौजदार अतुल वंजारी करीत आहेत.








