नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीनंतर दक्षिण काश्मीर परिसरात राबवण्यात आलेल्या शोध मोहीमेत लोलाब जंगल भागातून, लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना पकडण्यात जम्मू-काश्मीर पोलीस व 28-राष्ट्रीय रायफलच्या जवानांना यश आले.

ANI
✔
@ANI
Three newly recruited terrorists have been arrested by joint forces at Sogam of Kupwara district. Further investigation underway: Jammu and Kashmir Police
View image on Twitter
4,366
10:15 AM – May 21, 2020
Twitter Ads info and privacy
802 people are talking about this
पकडण्यात आलेले हे तिन्ही दहशतवादी नुकतेच लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी जोडल्या गेले होते. यातील दोघांची ओळख पटली असून झाकीर अहमद भट आणि आबिद हुसेन वानी अशी त्यांची नावे असल्याचे सांगण्यात येत आहेत.
या अगोदर जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा येथे 3 मे रोजी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी एक जण लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर हैदर होता. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक विजयकुमार यांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने याविषयी माहिती दिली आहे.
सुमारे आठ तास सुरु असलेल्या या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले होते. मात्र, यामध्ये दोन लष्करी अधिकाऱ्यांसह ५ जवान शहीद झाले होते. यात जम्मू-काश्मीर पोलिसांतील एका पोलीस उपनिरीक्षकाचा देखील समावेश होता.







