हरिपुरा ते वड्री येथील घटना
पाल (ता. रावेर) : वनविभागाच्या फिरत्या पथकाने हरिपुरा ते वड्री दरम्यान सोमवारी दुपारी १२ वाजता धाड टाकून २५ हजार रूपये किमतीच्या सागवान लाकडाच्या २७ चौकट पाट्या जप्त केल्या आहे. यावल पश्चिम वनविभागाने सर्व पाट्या एकत्र करून वनविभागाच्या निस्तार डेपोत जमा केल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिपुरा ते वड्री या रस्त्यावर सागाच्या वृक्षाचे लाकूड तोडून ठेवल्याची गुप्त माहिती वनविभागाच्या फिरत्या पथकाला प्राप्त झाली. त्यानुसार यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे, वनक्षेत्रपाल सुनील भिलावे, वनरक्षक सरला भोगरे, अश्रफ तडवी, अक्षय रोकडे, सुधीर पटणे, शरद पाटील यांनी कारवाई केली.