दोघांना कारागृहातून तर इतरांना घरातून घेतले ताब्यात
धुळे (प्रतिनिधी) : धुळे शहरालगत सुरत बायपास रस्त्यावर रात्री ११ वाजेच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या व्यक्तीस लुटणाऱ्या संशयित आरोपीना धुळे शहर पोलिसांनी अटक केली आहेत. त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
दादाभाऊ बारकू पारधी रा. कुंडाणे हे दिनांक २५ जून रोजी रात्री ११ वाजता सुरत बायपास रस्त्याने सिव्हिल हॉस्पिटलला जात असताना मागून मोटारसायकलने आलेल्या ३ अनोळखी व्यक्तींनी त्यांना मारहाण करून त्यांचा मोबाइल, पाकीट व त्यातील साहित्य, तसेच रोख रक्कम लांबवली होती. (केसीएन)या गंभीर गुन्ह्याची दाखल घेत धुळे शहर पोलिसांनी तपास सुरु केला. हिस्ट्री शिटर आरोपी बब्या उर्फ कृष्णा दिनेश गायकवाड (रा. राऊळवाडी) व भूषण शिवदास पाचारे (रा. नवजीवन नगर, फाशी फुल) आणि त्यांच्या साथीदारांनी हा गुन्हा केल्याची माहिती पोलीस निरीक्षक धीरज महाजन याना मिळाली.
मात्र यापूर्वी मोहाडी हद्दीत झालेल्या एका गुन्ह्यात जिल्हा न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांना तेथून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रोहन अनिल अवचित्ते (रा चितोड रोड) आणि सागर जगदीश प्रजापती (रा. सुशील नगर) या दोघां संशयित आरोपींची नावे कळली. (केसीएन)त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिली. त्यांच्याकडून मोबाईल,पाकीट, पॅनकार्ड, एटीएम कार्ड आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुढील तपास उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी हे करीत आहेत. हि कारवाई अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक किशोर काळे, सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी, पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, हे.कॉ दिनेश परदेशी, सचिन गोमसाळे, पो.ना. रवींद्र गिरासे, कुंदन पटाईत, कॉ. शाकीर शेख, महेश मोरे,प्रवीण पाटील, मनीष सोनगिरे, तुषार पारधी, अमित रणमळे, वसंत कोकणी, अमोल पगारे, योगेश ठाकूर, दिपक सैंदाणे यांनी केली.