जळगाव तालुक्यातील कठोरा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कठोरा येथे दुचाकीने जात असताना एका शेतमजुराला भरधाव अज्ञात वाहनाने शुक्रवारी दि. १९ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास धडक दिली. या धडकेत या शेतमजुराचा मृत्यू झाला असून जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
पेमा सूडया बारेला (वय ६८, रा. किसन फलिया, लिंबाई पो. इंद्रापूर ता. राजपूर जि. बडवाणी, मध्यप्रदेश) असे मयत मजुरांचे नाव आहे. ते पत्नी, ४ मुलांसह राहत होते. शेतात मजुरी काम करून उदरनिर्वाह करीत होते. (केसीएन)दरम्यान, शुक्रवारी दि. १९ जुलै रोजी रात्री तर कामावरून घरी जात असताना कठोरा गावाजवळ त्यांना अज्ञात भरधाव वाहनाने जबर धडक दिली. यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी रुग्णालयात येऊन आक्रोश केला. (केसीएन) याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पुढील तपास जळगाव तालुका पोलीस स्टेशन करीत आहेत.