चाकूने सपासप वार करून जळगावच्या तरुणाला नदीत फेकले ; दोघांवर गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील तरुण हा दिल्ली येथून गुरुवारी रेल्वेतील अप्रेंटीशीप करून दुपारी घरी आला. त्यानंतर मित्रांसोबत रात्री मुक्ताईनगर तालुक्यात गेला होता. यावेळी उसनवारी दिलेल्या पैशांवरून त्याच्याच मित्राने आणखी एकासोबत त्याचा घात करून त्याच्या गळ्यावर व छातीवर चाकूने सपासप वार करून खून केला. नंतर मृतदेह पूर्णा नदीपात्रात फेकल्याची फिर्याद मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे. नदीपात्रात शोधमोहीम घेतल्यानंतर तब्बल ९ तासांनी त्याचा मृतदेह हात पाय बांधलेले अवस्थेत आढळून आला आहे.
नितीन साहेबराव पाटील (वय २५, रा. कला वसंत नगर, असोदा रोड, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याचा भाऊ सचिन साहेबराव पाटील (वय २८) याने फिर्याद दिली आहे. नितीन पाटील याचे आयटीआय शिक्षण झाल्याने तो रेल्वे अॅप्रेन्टीशिप साठी सुमारे एक वर्षा पासुन दिल्ली येथे त्यांचे मित्रांसह राहतो. घराचे जवळच राहणारा संशयित आरोपी वैभव गोकुळ कोळी (वय २६) हा लहान भाऊ नितीन याचा सुमारे ५ वर्षापासुन मित्र आहे. (केसीएन)त्याने त्याचे लग्नासाठी मागील काही महिन्यापूर्वी काही पैसे माझ्या वडिलांकडून आणि भाऊ नितीन याचे कडून उसनवार घेतले होते. काल दि. १८ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास नितीन हा दिल्लीवरुन रेल्वेने जळगाव येथे घरी आला होता.
त्यानंतर त्याने जेवण करुन दुपारी ४ वाजता नितीन व त्याचा मित्र वैभव गोकुळ कोळी हे दोघे वैभव याच्या ज्युपीटर वाहनाने कोठे तरी गेले. त्यानंतर रात्री ८ वाजेपर्यंत फिर्यादी सचिन याचे मयत नितीनसोबत त्याचे मोबाईलवर बोलणी झाली होती. तेव्हा “मी थोड्या वेळात घरी परत येईल” असे सांगत होता. त्यानंतर रिंग जात होती परंतु तो तो फोन घेत नसल्याने तो अद्याप पर्यंत घरी का परत आला नाही म्हणुन भाऊला काळजी वाटु लागल्याने त्याने त्याचा मित्र वैभव कोळी यास रात्री साडे नऊ वाजता वैभवचा मोबाईलवर फोन केला. (केसीएन)तेव्हा त्याने सांगितले की “आम्ही मुक्ताईनगर येथील कु-हा गावाकडे जाणाऱ्या डोलारखेडा रोडवर असलेल्या जंगलाच्या रस्त्याने स्कुटीने आलो होतो. तेथे संशयित संतोष भागवत कठोरे रा. बोदवड याने जंगलात एका ठिकाणी थांबुन नितीन याचेवर चाकूने दोन तिन वार केले. म्हणुन मी तेथुन पळुन आलो आहे.
असे सांगितल्याने फिर्यादी सचिन तसेच जळगावातील मित्र असे नितीन यास शोधण्यासाठी जळगाव येथुन मुक्ताईनगर येथे निघालो. रात्रीची वेळ असल्याने मदतीसाठी भुसावळ येथील काहींना सोबत घेतले होते. तेथुन मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे येवुन तेथील पोलीसांना सोबत घेवुन वैभव सांगतो त्या प्रमाणे घटना ठिकाणी सचिन गेला असता तेथे रक्ताचे थारोळे साचलेले होते. ओढातान झाल्याचे दिसले. म्हणुन नितीन पाटील याचा घातपात झाला असेल या संशयामुळे जंगलात आजुबाजुला आणि जवळच असलेल्या पुर्णा नदीच्या काठावर फिर्यादी व पोलीस यांनी शोध घेतला.
घटना ठिकाणापासुन काही अंतरावर पुर्णा नदीच्या पुलावर असलेल्या कठड्याजवळ देखील रक्ताचे डाग लागलेले असल्याचे दिसले. त्यामुळे पुर्णा नदीच्या पात्रात पोलीस स्टाफ आणि पोलीसांनी बोलविलेले पाण्यात पोहणारे लोकं यांनी मयत नितीन पाटील यांचा शोध घेतला तेव्हा त्याचे प्रेत नदी पात्रात बुडालेले मिळुन आले. (केसीएन)तेव्हा त्याचे गळ्यावर व छातीवर धारदार चाकुने मारुन त्याला पुर्णा नदिच्या पाण्यामध्ये फेकले असल्याचे दिसुन आले.
त्यावरुन फिर्यादीच्या फिर्यादीवरून संशयित म्हणून वैभव गोकुळ कोळी रा. जळगाव व संतोष भागवत कठोरे रा. रा. बोदवड यांनी नितीन याने त्यांना उसनवार दिलेल्या पैश्याचे कारणावरुन लहान भाऊ नितीन पाटील याला धारदार चाकुने गळ्यावर व पोटावर वार करून ठार मारुन त्याचे प्रेत पुर्णा नदीच्या पात्रात फेकले आहे म्हणून तक्रार दिली. त्यानुसार मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास निरीक्षक नागेश मोहिते हे करीत आहेत.