• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

घरफोड्यांचे सत्र सुरूच, पारोळा तालुक्यात ५ ठिकाणी घरफोडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 18, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली


लाखो रुपयांचे ऐवज लंपास

पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील बहादरपुर, सिरसोदे, बोळे, वसंतवाडी येथे ५ ठिकाणी घरफोडी होऊन लाखो रुपयांच्या ऐवज व दागिने चोरी झाल्याची घटना दि. १४ जुलै रोजी रात्री घडली याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

याबाबत बहादरपूर येथील राजेंद्र अण्णाजी वाणी यांचे बंद घराचे कुलूप तोडून गोदरेज कपाटातील ७० हजार रुपये रोख व सात ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच गॅस सिलेंडर चोरून नेल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आनंदा एकनाथ सोनार यांचे बंद घरातील कडीकोंडा व कुलूप तोडून आठ-भार चांदी व तीन ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेण्याचे सांगण्यात आले. (केसीएन)तसेच शिरसोदे येथील किशोर पाठक यांचे देखील बंद घर फोडले परंतु त्यांच्या घरातील कुठल्याही प्रकारचे दागिने किंवा रोख रक्कम लंपास न झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी घटनास्थळी अमळनेर विभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर अभिजीत पाटील यांच्यासह पोलीस पथकाने भेट देऊन पंचनामा केला.

दुसऱ्या घटनेत बोळे व वसंतवाडी येथे दोन ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. लाखो रुपयाचे सोन्याचांदीचे दागिने व २० हजार रुपये रोख लांबविल्याची घटना घडली आहे. पारोळा तालुक्यातील बोळे येथील राजाराम मखा कोळी हे घराला कुलूप लावून कुठेतरी गावाला गेलेले असताना त्यांचे बंद घर लक्ष्य करून घराच्या कळीकोंडा कुलूप तोडून घरातील १५ ग्रॅम सोने व २० हजार रुपये रोख चोरून नेले तसेच वसंतवाडी तांडा येथील महारु हरचंद पवार यांचे गावातच दोन घरे असल्यामुळे ते एका घराला कुलूप लावून कुटुंबासह दुसऱ्या घरात झोपलेले असताना रात्री अज्ञात चोरट्यानीं त्यांच्या घराचे कडी कोंडासह कुलूप तोडून घरातील गोदरेज कपाटातील एकूण साडेतीन तोळे सोने व ४० भार चांदी चोरून नेल्याची घटना घडली.

घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, प्रकाश गवळी यांच्यासह अमळनेर पोलीस विभागीय अधिकारी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी भेट दिली. यावेळी श्वान पथक व फिंगर प्रिंट पथक हे बोळे वसंतवाडी शिरसोदे, बहादरपूर येथे मागविण्यात आले होते. मात्र श्वान पथकाने कुठल्याही प्रकारचा माग न दाखवल्यामुळे पोलिसांना पुढचा तपास करता आला नाही. सदर बहादरपुर, सिरसोदे व बोळे गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याने त्यात एक पांढऱ्या रंगाची कार दिसून येत आहे मात्र त्यात किती जण आहेत कोण आहेत हे दिसून आले नाही. बोळे येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सदर कार ही पहाटे ५ वाजून ११ मिनिटाला ढोलीकडे जाताना दिसून येत आहे. सदर चोरटे हे बोळे, वसंतवाडी मार्गे बहादरपुर शिरसोदेकडे चोरी करत गेले असून ते परत पहाटे धुळ्याकडे रवाना झाले असल्याचे दिसून येत आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पारोळा पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारचा गुन्हा नोंद करण्यात आलेला नव्हता.


 

 

Tags: #crime#jalgaon#parola
Previous Post

उघड्या घरातून वृद्धाचे दोन मोबाईल लंपास

Next Post

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी जामनेरात मोफत नोंदणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी जामनेरात मोफत नोंदणी

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी जामनेरात मोफत नोंदणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर
जैन कंपनी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर

June 7, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

गावठी कट्ट्यासह जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणारा जेरबंद

June 7, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

पीडितेच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी नाशिकला पाठविणार

June 7, 2026
महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
1xbet russia

महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

June 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर

June 7, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

गावठी कट्ट्यासह जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणारा जेरबंद

June 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon