एकाला अटक ; जळगावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी ) ;- वृध्दाच्या उघड्या घरातून १३ हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना शहरातील बालाजी पेठ परिसरात घडली असून याप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार सोनवणे वय २० रा. रिधूरवाडा ता. जळगाव असे संशयित चोरट्याचे नाव आहे.
प्रदीप कन्हैय्या प्रजापती वय ६२ रा. ओम नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबासह राहायला असून त्यांचे बालाजी पेठमधील ओम नगरात जूने घर आहे. त्याठिकाणी ते दरवाजा उघडा करून पलंगावर झोपलेले असतांना संशयित आरोपी ओंकोर सोनवणे याने घरात घुसून घरात ठेवलेले १३ हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल चोरून नेले. ही घटना उघडकीला आल्यानंतर त्यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.