यावल तालुक्यातील हरिपुरा येथील घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील हरिपुरा या गावात तू माझ्याशी विनाकारण वाद करतो असे बोलल्याच्या रागातून ४९ वर्षीय इसमाला एकाने वीट मारून फेकत दुखापत केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हरीपुरा या गावात संजय मुस्तफा तडवी (४९) हे घरासमोर उभे होते. तेथे इतबार सरफराज तडवी हा आल्यानंतर त्याने वाद घातला. माझ्याशी विनाकारण वाद घालू नको अशा बोलण्याच्या रागातून इतबार तडवी याने संजय तडवी शिवीगाळ करून मारहाण केली आणि वीट मारून फेकली. त्यात त्यांच्या गुडघ्याजवळ दुखापत झाली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात इतबार तडवीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप करीत आहे.