जळगाव (प्रतिनिधी ) ;- शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालय येथे आषाढी एकादशी निमित्त वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले .
यावेळी वनविभागाचे एमएफबी श्री. सुनील पाटील साहेब ,व संभाजी पाटील , प्रवीण पाटील शाळेचे मुख्याध्यापक आर .एस .आंबटकर सर पर्यवेक्षिका एस .पी .दुबे यांनी वृक्षदिंडीचे व विठ्ठल रुक्माई च्या प्रतिमेचे पूजन केले शिरसोली गावात शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष करत व झाडे लावा झाडे जगवा वसुंधरा वाचवा अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला.
सदर वृक्षदिंडी चे नियोजन सांस्कृतिक प्रमुख डी .जी. कुलकर्णी, जी. बी .काळे, राष्ट्रीय हरित सेना प्रमुख सी .एस. कुमावत यांनी केले सर्व कार्यक्रमासाठी श्री. आर .के. पाटील , एस. एन. ताडे बी .आर .बारी मनोज बारी ,डी .के .पाटील सौ .नेत्रा वाणी , मनीषा बारी मॅडम व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.