एलसीबीची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) एका तरुणाला दुचाकी चोरी केल्याप्रकरणी अटक केली आहे. त्याने नाशिक शहरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली असून दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील, भारत पाटील यांना दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सूचना दिल्या होत्या.(केसीएन) नमुद पथकातील पोलीस अंमलदार यांनी संशयीत आरोपी कुणाल ललीत तिवारी (वय -१९, लक्ष्मण भाऊ नगर, जळगांव) यास ताब्यात घेवुन त्याचे कडुन सुमारे एक ते दिड महीन्यापुर्वी नाशिक रोड पोलीस स्टेशनला दाखल गुन्हा उघडकीस केला. त्याचे ताब्यातुन सदर गुन्हयात चोरीस गेलेली दुचाकी एमएच १५ एचके २९६५ क्रं.चे होंडा कंपनीची, सुमारे २५ हजार रुपये किं.चे त्याचे कडुन हस्तगत केली. पुढील कारवाईकामी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे अंमलदार यांचे ताब्यात दिले आहे..